Ather Rizta लाँच ! मोठी सीट, जबरदस्त रेंज आणि स्मार्ट फीचर्स

Ather Rizta लाँच! मोठी सीट, जबरदस्त रेंज आणि स्मार्ट फीचर्स

भारतीय कुटुंबांसाठी परफेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर !

सध्या प्रत्येक जण एक स्मार्ट आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात आहे, तेव्हा Ather ने आपल्या नवीन मॉडेल Ather Rizta ला लाँच करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही स्कूटर विशेषतः भारतीय कुटुंबांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. नवीन लुक, मोठी सीट आणि स्टोरेज स्पेस हे नवीन फिचर्स Rizta ला बाकी स्कुटर्स पेक्षा वेगळं बनवते.

रेंज आणि बॅटरी –

Ather Rizta दोन मुख्य मॉडेल S आणि Z मध्ये उपलब्ध आहे. Rizta S – 2.9 Kwh आणि Rizta S – 2.9 Kwh Pro Pack या दोघांची ex-showroom किंमत ₹1,30,456 आहे. दुसरीकडे, जर प्रिमियम व्हेरियंट हवा असेल, तर Rizta Z ची किंमत ₹1,43,895 आहे.

तिन्ही मॉडेल्समध्ये 123 कि.मी रायडिंग रेंज आणि 80 Km/h चा टॉप स्पीड हा एकसारखाच आहे.
सगळ्यांमध्ये 2.9 kwh ची समान बॅटरी मिळते. तर Z व्हेरिएंट 2.9kWh आणि 3.7kWh अशा दोन्ही बॅटरी पर्यायांमध्ये येतो.

फिचर्स –

Ather Rizta मध्ये दोन राईड मोड मिळतात. Smart Eco आणि Zip, ज्यामुळे तुम्ही रेंज किंवा परफॉर्मन्सनुसार तुमची राईड निवडू शकता. Z व्हेरिएंटमध्ये 7-इंचाचा कलर TFT डिस्प्ले मिळतो ज्यामध्ये ब्लूटूथ, नेव्हिगेशन आणि कॉल/मेसज नोटिफिकेशनसारख्या सुविधा समाविष्ट आहेत. तर S मॉडेलमध्ये Deepview LCD डिस्प्ले आहे जो स्पष्ट आणि वाचायला सोपा आहे.

टेक्नॉलॉजी आणि सेफ्टी –

Ather Rizta ची सगळ्यात अनोखी गोष्ट म्हणजे त्याचा अंडरसीट वायरलेस चार्जर जो Ather Halo स्मार्ट हेल्मेट चार्ज करतो. यासोबतच यात Ather Skid Control नावाचं ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आहे जे मऊ रस्त्यांवर स्कूटरला संतुलित ठेवते.

सीट, स्टोरेज आणि सस्पेंशन –

या स्कूटरची 900 mm लांब सीट बाकी स्कूटरपेक्षा मोठी आहे, 34 लिटरचं अंडरसीट स्टोरेज आणि अ‍ॅक्सेसरी फ्रंकसह एकूण 56 लिटरची स्टोरेज क्षमता मिळते. टेलीस्कोपिक फोर्क सस्पेंशनची आणि मोनोशॉक दिले आहेत.
तसेच Rizta Z मध्ये pillion backrest दिलं आहे, जे दीर्घ प्रवासात मागच्या व्यक्तीसाठी आरामदायक ठरतं. पण Rizta S आणि S Pro Pack मध्ये ही सोय नाही.
तसेच Rizta Z मध्ये pillion backrest दिलं आहे, जे दीर्घ प्रवासात मागच्या व्यक्तीसाठी आरामदायक ठरतं. पण Rizta S आणि S Pro Pack मध्ये ही सोय नाही.

(या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती केवळ सामान्य माहिती आणि जनजागृतीसाठी आहे. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता, संपूर्णता किंवा अद्ययावतता सुनिश्चित करत नाही. स्कूटरच्या किंमती, फिचर्स, स्पेसिफिकेशन्स किंवा इतर तपशील वेळोवेळी बदलू शकतात. कृपया कोणताही निर्णय घेण्याआधी संबंधित अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत डीलरशी संपर्क साधावा.)

 

Leave a Comment