ChatGPT मराठीत कसं वापरायचं ? Step by step guide 2025 !

ChatGPT मराठीत कसं वापरायचं ? Step by step guide 2025 !

ChatGPT म्हणजे नेमकं काय? मराठीत माहिती देणारी आकर्षक सोशल मीडिया ग्राफिक

ChatGPT म्हणजे नक्की काय रे भाऊ 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजेच Artificial Intelligence हे नाव सर्वत्र Sketch आहे. आज शाळा छोटे मोठे उद्योग, शेती, फिल्म इंडस्ट्री, मिडिया, हेल्थ सेक्टर या व यासारख्या अनेक क्षेत्रात AI चा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. याचाच एक भाग म्हणजे ChatGPT – OpenAI या कंपनीने तयार केलेलं एक स्मार्ट चॅटबॉट. याला विचारलं की हे तुमच्याशी माणसासारखं बोलतं, शंका सोडवतं, माहिती देतं आणि काही वेळा तर सल्लाही देतं. हे म्हणजे एक प्रकारचं डिजिटल सहाय्यक आहे, जे तुमचं काम, शिकणं किंवा विचार करणं अगदी सोपं करतं.

ChatGPT कसं वापरायचं? (Step-by-Step guide)

१. मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये ब्राऊजर उघडा
(इंटरनेट चालू असल्याची खात्री करा. मोबाईलमध्ये Chrome किंवा लॅपटॉपमध्ये कुठलाही ब्राऊजर उघडा)

२. ChatGPT ची वेबसाईट उघडा
वेबसाईट आहे 👉 https://chat.openai.com

३. लॉगिन / साइन अप करा

आधीच अकाऊंट असेल तर “Log in” करा. नसेल तर “Sign up” करून तुमचं अकाऊंट तयार करा (तुमचं ईमेल आणि मोबाईल नंबर लागेल).

४. विचारायला सुरुवात करा

एकदा लॉगिन केलं की समोर एक chat window दिसेल. तिथे तुम्ही हवं ते विचारू शकता.

ChatGPT कशासाठी वापरता येतो ? –

ChatGPT चा वापर शाळकरी मुलांपासून मोठ्या उद्योगधंद्यांपर्यंत कोणीही करू शकतो. विद्यार्थी अभ्यासासाठी शंका विचारू शकतात, निबंध किंवा प्रोजेक्टसाठी माहिती तयार करू शकतात. लेखक ब्लॉग, कथा, कविता लिहून घेऊ शकतात. जाहिरात मजकूर, ईमेल्स, रिपोर्ट, सोशल मीडियावर पोस्ट लिहायच्या असतील तर त्यासाठीसुद्धा ChatGPT उपयोगी आहे.

ChatGPT वापरताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा –

ChatGPT स्मार्ट असलं तरी ते संपूर्णपणे अचूक असेलच असं नाही. याचं उत्तर अनेकदा माहितीच्या आधारे असतं, पण कधी कधी ते जुनं किंवा अर्धवटही असू शकतं. त्यामुळे ही माहिती वापरण्याआधी ती थोडीशी पडताळून पाहा दुसरं म्हणजे, गोष्ट मराठीत हवी असेल तर तुम्ही प्रश्नाच्या शेवटी “मराठीत उत्तर द्या” असं लिहा.

सूचना:

वरील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. ChatGPT वापरताना येणाऱ्या कोणत्याही अनुभवाची जबाबदारी आमची नसेल. कृपया माहितीचा वापर स्वतःच्या जबाबदारीने करा.

Leave a Comment