25 ओटीटी अ‍ॅप्सवर सरकारची कात्री

दिल्ली | प्रतिनिधी
भारतातील ओटीटी माध्यमांवर वाढत्या अश्लील व अपसंस्कृतीच्या प्रसारावर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने तब्बल २५ ओटीटी अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सवर बंदी (25 ott apps banned) घालण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवर नग्नता, अश्लील दृश्ये, अपसंस्कृतीचे जाहिरातबाजीद्वारे प्रसार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

कोणकोणते अ‍ॅप्स झाले बॅन?

  • ALTT
  • ULLU
  • Big Shots App
  • Jalva App
  • Wow Entertainment
  • Look Entertainment
  • Hitprime
  • Feneo
  • ShowX
  • Sol Talkies
  • Kangan App
  • Bull App
  • Adda TV
  • HotX VIP
  • Desiflix
  • Boomex
  • Navarasa Lite
  • Gulab App
  • Fugi
  • Mojflix
  • Hulchul App
  • MoodX
  • NeonX VIP
  • Triflicks

बंदी मागचं कारण काय?

मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या बहुतेक सामग्रीत कोणताही सामाजिक विषय, कथानक किंवा सुसंगत संदेश नव्हता. (25 ott apps banned) केवळ नग्नता, अश्लील दृश्ये आणि कौटुंबिक नात्यांचे विकृतीकरण दाखवणारी दृश्ये यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यामुळे भारतीय आयटी कायदा, २०२१, तसेच अश्लीलता प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आधीही दिली होती सूचना

याआधी, फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मना मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून जबाबदारीने कंटेंट तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही काही अ‍ॅप्सने अश्लील व अपमानास्पद सामग्री प्रसारित करत राहिल्याचे निदर्शनास आले. (25 ott apps banned)

इंटरनेट सेवा पुरवठादारांना दिले आदेश

मंत्रालयाने सर्व इंटरनेट सेवा पुरवठादार (ISP) यांना या २५ अ‍ॅप्स व वेबसाइट्सवरील सार्वजनिक प्रवेश बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता हे अ‍ॅप्स भारतात वापरणे पूर्णतः बंद होणार आहे.

डिजिटल युगात ओटीटी प्लॅटफॉर्म ही एक प्रभावी माध्यम बनली असताना, त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे परिणाम समाजावर विपरित होतात. कौटुंबिक नातेसंबंधांची विकृती, लैंगिकतेचे गैरप्रकारे सादरीकरण, तरुण पिढीवर विपरीत प्रभाव हे या बंदीच्या मुळाशी असलेले मुद्दे आहेत.

सरकारच्या या निर्णयावर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (25 ott apps banned) काहीजण या निर्णयाचे स्वागत करत आहेत, तर काहीजण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहून सृजनशीलता जोपासणं हेच सध्या माध्यमांसमोरील मोठं आव्हान बनलं आहे.

Leave a Comment