अहिल्यानगर नवीन विमानतळ प्रस्ताव, जिल्ह्यात कुठे येणार नवीन विमानतळ ?
खा. निलेश लंकेची केंद्र सरकारकडे मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)-अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार डॉ. नीलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. (अहिल्यानगर नवीन विमानतळ प्रस्ताव ) नागरी उड्डयन मंत्री किंजारापू नायडू यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी औद्योगिक, पर्यटन, संरक्षण व कृषी क्षेत्राला नवा वेग देण्यासाठी ही सुविधा अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. …