आझाद मैदान तातडीने रिकामे करा, मुंबई पोलिसांनी बजावली मनोज जरांगेंना नोटीस
मुंबई (प्रतिनिधी)- ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणासाठी मराठा समाजाचा निकाराचा लढा सुरू झाला आहे. मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. त्यामुळे मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. (Mumbai …