
मुंबई (प्रतिनिधी)- ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणासाठी मराठा समाजाचा निकाराचा लढा सुरू झाला आहे. मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. त्यामुळे मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. (Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil) तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी,मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते. त्यानंतर मुंबईत पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. (Mumbai Maratha Protest) आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे.मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर आज नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजवली आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आल्याआहे. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत पत्रात म्हटले आहे. आज हायकोर्टात सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात सुनावणी होणार आहे. गेल्या दहा वर्षांतील आंदोलनाचा इतिहास पाहता मराठ्यांनी अभूतपूर्वी शिस्तीचे पालन केल्याचे दिसून येते. त्यामुळे आंदोलनातील हे घुसखोर शोधून त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन आंदोलकांसमोर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले कि मनोज जरांगे यांना उपोषणाला जी परवानगी देण्यात आली होती, त्याला काही अटी-शर्ती होत्या. या अटींचे उल्लंघन झालेले आहे. विशेषत: रस्त्यावर ज्या गोष्टी चालू आहेत, त्यावर न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे हे निर्देश पालन करणे हे सरकारला क्रमप्राप्त आहे. त्या निर्देशांचे सरकार पालन करेल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.